कोरोनावरील स्वदेशी बनावटीची लस शोधण्याच्या प्रयत्नांचे मोदींनी केले कौतुक

narendra modi

हैदराबाद – डीएनएवर आधारीत कोरोनावरील स्वदेशी बनावटीची लस शोधण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. त्यांच्या या प्रयत्नात भारत सरकार सक्रिय सहभागी होईल, असे आश्वस्तही त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली.पंतप्रधानांनी सकाळी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली सध्या मोडी पुण्यात आहेत.

स्वदेशी कोविड लसीबद्दल हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधा केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. लसीसंदर्भात आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांची टीम या कार्यात वेगाने प्रगती व्हावी यासाठी आयसीएमआर बरोबर काम करत आहेतअसे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या