fbpx

‘त्या’ महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव

टीम महाराष्ट्र देशा : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं आहे. महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेनंतर मोठा अनर्थ टळला. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं. मात्र दुर्दैवाने विमानाच्या महिला पायलट मरिया यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
विमानाच्या पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे.

विमान दुर्घटना ज्याठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये अपघातग्रस्त झालं.

1 Comment

Click here to post a comment