fbpx

मी भारतात परतलो तर लोक मला मारून टाकतील – मेहुल चोक्सी

नवी दिल्ली : भारतात एखाद्या प्रकरणात दोषी सापडलेल्या माणसाला जमावाकडून मारहाण करण्यात येते, अशा काही घटना गेल्या काही दिवसात उघड झाल्या आहेत. त्यामुळे आपण भारतात परतलो तर लोकांचा जमाव मला सोडणार नाही, मारहाण करेल. ही मारहाण एवढी जबरदस्त असेल की त्यातच माझा मृत्यू होईल अशी भीती वाटत असल्याचे मेहुल चोक्सीने म्हटले आहे.

निरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी सध्या पिएनबी बँक घोटाळाप्रकरणी फरार आहेत. दरम्यान भारतात परतण माझ्यासाठी धोकादायक आहे. अनेक लोकांकडून, माझ्या जीवाला धोका आहे.तसचं मला जमावाकडून मारहाण होऊन त्यात माझा मृत्यू देखील होऊ शकतो अशी भीती आपल्याला वाटत असल्याने आपण भारतात परतणार नसल्याचं चोक्सीने म्हंटले आहे.

पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू करण्यात आले आहे. हा वॉरंट रद्द व्हावा म्हणून त्याने सीबीआय कोर्टात अर्ज देखील दाखल केला आहे. मेहुल चोक्सीने त्याचे वकिल संजय अबॉट आणि राहुल अग्रवाल यांच्या मदतीने कोर्टात अजामीनपात्र वॉरंट रद्द केले जावे यासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच तपास यंत्रणा माझ्यासोबत भेदभाव करत आहेत असाही आरोप मेहुल चोक्सीने केला आहे.