मी तर राजीनामा देणार नाहीच, पण खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

नागपूर: मुंबईतील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे, सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सिडको घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती, दरम्यान, सर्व व्यवहार हे आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या निमानुसारच झाले असल्याचं सांगत मी राजीनामा देणार नाहीच, पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आघाडी सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या गेल्या, त्यावेळी जमीन व्यवहाराचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे जमीन वाटपाशी मंत्र्यांचा किंवा मंत्रालयाशी संबंध नसल्याच फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्व व्यवहार हे निमानुसारच झाले आहेत. बाबा, तुम्हाला अनेकवेळा माहित नसतं आणि तुम्ही आरोप करता, सज्जन माणसं असं करत नसतात म्हणत मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवरच हल्लाबोल केला.

Loading...

पुढे बोलताना फडणवीस यांनी कोयना प्रकल्प ग्रस्तांना दिलेल्या रायगड जिल्ह्यातील जमीन वाटप प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे, तसेच आघाडी सरकारच्या काळात गेल्या पंधरा वर्षात 200 प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनींचीही चौकशी करणार असल्याच सांगितले आहे.

नेमक काय आहे प्रकरण
नवी मुंबईतील सिडको येथील जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीचा अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाच गुंतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडकोची जमीन हि नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!