एल्गार परिषदेत माओवाद्यांचा हात आहे हे मी छातीठोक पणे सांगू शकतो : रवींद्र कदम

पुणे : माओवाद्यांची दोनशे ते अडीचशे एक्सकल्युझिव्ह पत्रं आमच्याकडे आहेत असं सांगत एल्गार परिषदेत माओवाद्यांचा हात आहे हे मी छातीठोक पणे सांगू शकतो असा दावा पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी केला आहे.पुण्यातील एल्गार परिषद आणि त्याचा माओवाद्यांशी असलेला संबंध खणून काढण्याच काम रवींद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी केलय, कदम यांचा माओवादी चळवळीबाबत असलेला अभ्यास आणि त्याविरोधात केलेल्या कारवाया यासंदर्भात पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या वतीने शहरी माओवाद या विषयावर आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

माओवाद्यांच्या वाटचालीचा विचार केला तर वाढत्या शहरी माओवादाचा पहिला टप्पा एल्गार परिषदेच्या माध्यमातून गाठला गेलाय. केंद्र सरकारची सुरू असलेली वाटचाल आणि त्यांच्या कडून घेतले जात असलेले निर्णय माओवादी चळवळीला अडचणीचे वाटतायत केंद्रा प्रमाणेच राज्यसरकारांची वाटचाल ही सुरू होईल अस माओवाद्यांना वाटत असल्याच कदम म्हणाले.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या माओवादी कनेक्शन संदर्भात पुणे पोलिसांनी मुंबई दिल्ली आणि नागपूर मधून 5 माओवाद्यांना अटक केलेली आहे. या कारवाई बाबत कदम यांनी या वार्तालापात अधिक प्रकाश टाकला.एल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसात दाखल झालेली तक्रार ही नैसर्गिक होती कुणाच्या दबावामुळे ही तक्रार दाखल झालेली नव्हती अस स्पष्ट करत या प्रकरणात माओवाद्यांची फक्त तीन पत्र लीक झाली आहेत, त्यावरून आरोप झाले मात्र पुणे पोलिसांकडून ही पत्र लिक झालेली नाही हे खात्रीपूर्वक सांगतो अस कदम म्हणाले.

माओवाद्यांची दोनशे ते अडीचशे एक्सकल्युझिव्ह पत्रं आमच्याकडे आहेत असं सांगत एल्गार परिषदेत माओवाद्यांचा हात आहे हे मी छातीठोक पणे सांगू शकतो आणि सुरेंद्र गडलिंग तसच शोमा सेन यांच्यामार्फत पैसा पोहचला आहे हे निश्चित आहे, कुणाच्याही दबवा शिवाय तपास सुरू आहे, काही जणांची नाव आमच्या समोर आहेत त्यादिशेने पोलीस तपास करतायत अस कदम म्हणाले.

एल्गार परिषदेत प्रकाश आंबेडकर, आमदार जिग्नेश मेवानी यांनी भाषण केलेले असलं तरी त्यांचा माओवाद्यांशी संबंध नाही हे आधीच स्पष्ट केलय प्रकाश आंबेडकर यांचे नाव माओवादयांच्या पत्रात असलं तरी त्यांचा माओवाद्यांशी कुठलाही संबंध नाही असं कदम यांनी स्पष्ट केलं. एल्गार परिषदेच्या व्यसपीठावर असलेल्या प्रत्येकाचा माओवाद्यांशी संबंध नव्हता तसेच एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा इथे झालेल्या हिंसाचाराशी माओवाद्यांचा संबंध नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं….शहरी माओवाद हा पद्धतशीरपणे फैलावला जातोय एल्गार परिषद हे त्याचं उदाहरण आहे, शहरातील विद्यार्थी आणि कामगार हे माओवादयाच लक्ष आहेत त्यांच्या माधमातून माओवाद पुढे नेला जातोय असं देखील त्यांनी सांगितलं.