“पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा, पाहीन मी याची देही याची डोळा”

netrawari

यावर्षी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३३ वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे ८ वे वर्ष.

Loading...

फेसबुक दिंडी नेहमीच पंढरीच्या वारीतील e- वारकर्यांसाठी पालखीचे फोटो, व्हीडीओ तसेच लाईव्ह अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येते.

टीम फेसबुक दिंडी यावर्षी व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आपणासमोर एक अभिनव उपक्रम घेऊन येत आहेत “नेत्रवारी”.

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासच दर्शन घडवणारी एक महान परंपरा. या वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मांना, पंथांना सामावून घेतले, अशी हि महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेच दर्शन घडवणारी वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासारख सुख दुसर्या कुठल्याच गोष्टीत नाही.

आणि म्हणूनच

“पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा

पाहीन मी याची देही याची डोळा”

अस म्हणत आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाच गोजिर रूप पहाण्यासाठी वारीत पायी पंढरपूरपर्यंत चालत जातात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सामील होता येत नाही असे लाखो e- वारकरी आपल्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळवतात.

पण आजही आपल्याच समाजातील एक घटक या सुख सोहळा पहाण्यापासून वंचित आहे आणि ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना आपण हि वारी कशी दाखवू शकतो या सध्या कल्पनेतून जन्म झाला तो नेत्रवारीचा.

पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी यावर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करीत आहे.

सोबत दिलेल्या लिंक  (https://play.google.com/store/apps/details?id=in.infinityits.fbd) वरून फेसबुक दिंडी चे app डाउनलोड करून नेत्रदानाचा फॉर्म भरून नेत्रदाता बना.

रंगविशेष टीम ने फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठींबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे भावनिक आवाहन करणारा “नेत्रवारी” नावाचा लघुपट हि बनवला आहे, या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.

पहा लघुपट …

सन २०१६ साली फेसबुक दिंडी टीम ने राबविलेल्या “पाणी वाचवा”  या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच गतवर्षी वारी “ती” ची या उपक्रमातही लोक सहभागी झाले. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या “नेत्रवारी”  मोहिमेलादेखील आपण नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद द्याल असा विश्वास वाटतो.

आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रावारीमध्ये सहभागी होऊया…!!! 

फेसबुक दिंडी इव्हेंट जॉईन करण्यासाठी https://www.facebook.com/events/1732023463555955 लिंक वर क्लिक करावे.

यासाठी फेसबुक दिंडी टीम चे सदस्य स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर,  ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी कार्यरत आहेत.Loading…


Loading…

Loading...