अखेर माधव भंडारींना मंत्रिपदाचा दर्जा !

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते माधव भंडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Loading...

शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आयात उमेदवार दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून बढती मिळत असल्याने निवडणुकीपूर्वी माधव भंडारी यांची बोळवण करण्यात आली आहे.

दरम्यान, भंडारी गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या शर्यतीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भंडारी यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आयात उमेदवार प्रसाद लाड यांना तिकीट देण्यात आलं होतं.Loading…


Loading…

Loading...