कॉंग्रेसमुळेच मी पट्टेवाल्याचा गृहमंत्री झालो : सुशीलकुमार शिंदे

sushilkumar shinde

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची शाब्दिक जुगलबंदी पाहिला मिळाली. सुशीलकुमार शिंदे हे चांगले नेते आहेत पण चुकीच्या मार्गावर चालत आहेत, या विक्रम गोखले यांच्या वक्तव्यानंतर आपल्या राजकीय वाटचालीचा आढावा देत मी चुकीच्या मार्गावर नसून बरोबर चाललो आहे, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसमुळेच इथ पर्यंत आलो असे विधान केले आहे.

सुशीलकुमार शिंदे हे चांगले नेते आहेत. मात्र, चुकीच्या मार्गावर चालत आहेत. हा माणूस जिथे आहे, तिथे नसता तर कुठे असता, असे विक्रम गोखले म्हणाले. यावर सुशीलकुमार शिंदे देखील उत्तरले म्हणाले की, सोलापूरच्या न्यायालयात मी साधा पट्टेवाला होतो. काँग्रेसने मला लोकसभेचा नेता केले, देशाचा गृहमंत्रीही झालो. दुसऱ्या पक्षात गेलो असतो, तर काहीही मिळाले नसते. आताही इकडचे कितीतरी लोक तिकडे गेले आहेत आणि गुपचूप बसले आहेत.