देशहितासाठी मी आणि जगताप एकत्र आलो : खासदार बारणे

पिंपरी-चिंचवड – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटकपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आता अखेर या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे राष्ट्रवादी आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण बनले आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जगताप आणि बारणे एकत्र कसे आले या प्रश्नाचे उत्तर बारणे यांनी दिले. ‘अनेकांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि मी एकत्र न येण्यासाठी देव पाण्यात ठेवले. पण, देशहितासाठी आम्ही सर्व हेवेदावे विसरून आम्ही एकत्र आलो, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

बारणे पुढे म्हणाले,मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर मतदान आपल्या बाजूनेच कौल देतील. मोदी सरकारने भरीव काम केले आहे. ते काम सर्वांपर्यंत पोहोचविणे ही आपली गरज आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशपातळीवरून राज्य आणि आता राज्यपातळीवरून केवळ लोकसभा मतदारसंघापुरता उरला आहे, अशी टीका त्यांनी केली.Loading…


Loading…

Loading...