शिवसैनिक म्हणून मी तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहे, आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना शब्द

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी तर शहरी बाबू आहे पण शिवसैनिक म्हणून मी तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहे, तसेच ‘स्वतःचे बरे वाईट करून घेण्याचा विचार मनात आणू नका असा विचार मनात आला तर शिवसेनेची आठवण काढा शिवसेना तुमच्या मदतीसाठी उभी राहील. असा विश्वास शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लातूर दौऱ्यावर असताना तेथील जनतेला दिला.

आदित्य ठाकरे सध्या लातूर दौऱ्यावर असून त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या अविश्वसनीय कर्जमाफीला देखील टोले मारले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की , ‘शहरामध्ये मोठमोठाली होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात असून प्रत्यक्षात मात्र कोणाचे १७ रुपये माफ होतात तर कोणाचे १३ रुपये माफ होत आहेत. तसेच आमचा शेतकरी काही गुन्हेगार नाही त्यामुळे आम्हाला कर्ज माफी नाही तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.

दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की , आज पर्यंत मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळ येत होता आता मात्र ऑक्टोबरपासूनच दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आहे. दुष्काळ कितीही गंभीर असू द्या शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’ असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी लोकांना दिला.तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो कोणालाही मतदान करणारे असाल दुष्काळात चिंता करू नका घाबरू नका तुमच्या संकटात शिवसेना खंबीरपणे तुमची सोबत करेल.तसेच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली आहे’, असे त्यांनी सांगितले.