मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा-शिक्षण सभापती विकास रेपाळे यांचे प्रतिपादन

ठाणे- “विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य आहेच, ती तर प्राथमिकता परंतु शिक्षकांचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याकरिता मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” असे शिक्षण सभापती यांनी ठाणे जिल्हा शिक्षक सेना- ठाणे मनपा शिक्षक संघटना, शिक्षण समिती व प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत सांगितले. शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी ही एकत्रित बैठक बोलावली होती. अतिरीक्त आयुक्त उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, लेखाधिकारी धुरी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

२४ वर्षाची निवड श्रेणी व त्यावरील आक्षेप, मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षक समायोजन, गटाधिकारी पदोन्नती, गृहकर्जाचा हिशोब, अडकलेली pf कर्ज, सेवापुस्तक अद्यावत करण्याकरिताची कार्यशाळा, BLO कामे आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. सर्वच विषयांना कालमर्यादा ठरवून त्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावयाच्या सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त उन्हाळे व शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी दिल्या.

Loading...

“शिक्षक गौरव दिनापूर्वी यातील बरेचसे विषय मार्गी लागतील, कारण पाठपुरावा हे माझे बलस्थान आहे”, असे सभापती यावेळी बोलले. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीकरिता आम्ही बांधील असून त्यात शिक्षकांची मनस्थिती देखील सकारात्मक वातावरण निर्मिती करत असते त्यामुळे त्यांचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. हे त्यांनी कबूल केले..!

यावेळी शिक्षक संघटनेचे बाबाजी फापाळे, राजेंद्र निकम, प्रकाश गायकवाड, जगन जाधव, राजन भोसले, उमाकांत कुडे तसेच एक्का फौंडेशनचे प्राजक्त झावरे-पाटील, सचिन घोडे, बाळराजे जाधव, गिरीश शेलार उपस्थित होते. एकंदरीत , कालमर्यादेत हे सर्व प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन यावेळी सभापतींनी दिले.

शिक्षक मतदारांच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार?

गेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू