‘मी आज…’; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित

‘मी आज…’; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित

एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. याच अनुषंगाने आता कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का दिला.

भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधले आणि शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत येत आहे. महेश पाटील यावेळी बोलताना चुकून भाजपत प्रवेश करत असल्याचं म्हटले हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली. यानंतर महेश पाटील यांनी चूक सुधारत माफ करा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सवय सुटत नाही सांगत ते देखील हसत होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केले. तसंच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षात आलेले कार्यकर्ते अथक परिश्रम करतील,अशी अपेक्षा देखील शिंदेनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या: