मोहोळ विधानसभेला भुमीपुत्र या मुद्या मुळे मीच प्रबळ दावेदार – नागेश वनकळसे

टीम महारष्ट्र देशा – मोहोळ विधानसभेला भुमीपुत्र आणि विकास या मुद्या मुळे मी प्रबळ दावेदार, लढलो तर शिवसेनेतुनच लढणार आहे. आगामी विधानसभेत सेना भाजप युती झाली तरी हा मतदार संघ शिवसेनेलाच सुटणार आहे त्यामुळे मी शिवसेनेतुनच लढणार असे प्रतिपादन नागेश वनकळसे यांनी केले.
याबाबत पुढे बोलताना वनकळसे पुढे म्हणाले की शिवसेनेला मोहोळ मध्ये एक होमपीच आहे. फक्त सर्व संघटन एका रेषेत आणने महत्वाचे आहे, इथ नव्या दमाची फळी आहे. पहिल्यांदा संपर्क प्रमुख म्हणुन तानाजीराव सावंत यांच्या रूपाने ताकतीचे मिळाले आहेत. त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच संघटन जोरदार आहे. तालुक्यात शिवसेनेचे नेते दिपक गायकवाड, विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख, तालुका प्रमुख अशोक भोसले,उपजिल्हाप्रमुख चरणराज चवरे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, शहरप्रमुख रणजीत गायकवाड या सर्वाची एक मोठी यंत्रणा आहे या सर्वांच्या मार्फत एक दिलाने यंत्रणा लागली की विधानसभेवर भगवा फडकवण सोपी गोष्ट आहे.
येणाऱ्या विधानसभेत भुमीपुत्राचा मुद्दा कळीचा ठरणार आहे , गेटकेन लोक तालुक्यात चकरा मारू लागली आहेत, त्यांना तालुक्याच देण घेण नाही लांब लचक भारी किमतीच्या गाड्यात येऊन फसवतील, परत मतदार संघातुन गायब होतील. तालुक्यात प्रलंबित प्रश्न तसे न तसेच आहेत, एकही सिंचनाची योजना पुर्ण झालेली आहे, नदी भागातील रस्त्यांची बेसुमार वाळू उपशामुळे चाळण झालेली आहे.
यासाठी लोकचळवळ उभा करावी लागेल, उपऱ्या माणसाला याच काही एक देण घेण नाही,त्यामुळ पक्षाने संधी दिली तर मी ताकतीने उतरणार आणि नाही उमेद्वारी दिली तरी पक्षाचा उमेद्वार निवडुन आणण्यासाठी शिवसैनिक म्हणुन ताकत लावणार असल्याचे मत वनकळसे यांनी व्यक्त केले.