fbpx

‘मी बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव आहे’

LaluYadav

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे आता शेवटचे तीन टप्पे राहिले आहेत त्यामुळे बिहार मधील राजकीय रण आता चांगलेच तापले आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजप्रताप यादव यांनी आक्रमक पवित्रा घेत मी लालू प्रसाद यादवांचे रक्त आहे. मी खरा वारीस असून बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावा केला आहे.

जहानाबादमध्ये राजदचे उमेदवार चंद्रप्रकाश यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी तेजप्रताप यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत चांगलीच टोलेबाजी केली. लालू यादव हे खूप उत्साही व्यक्ती होते. ते एका दिवसात १० ते १२ प्रचारसभा घेत होते. परंतु, काही नेते (तेजस्वी यादव) दोन सभा घेऊन लगेच थकून जातात. मागील काही दिवसांमध्ये तेजस्वी यादव यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याने अनेक सभा रद्द केल्या होत्या. ते पुढे म्हणाले, मी लालू यादव यांचे रक्त आहे. लालू आमचे आदर्श गुरु आहेत. मी बिहारचा दुसरा लालू यादव आहे, असा दावाही तेजप्रताप यांनी केला.

दरम्यान लालूप्रसाद यादव यांना चारा घोटळ्यातील चौथ्या प्रकरणात न्यायालयाने १४ वर्षांची शिक्षा आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला होती. चारा घोटाळ्यात एकूण सहा प्रकरणे आहेत, यातील चौथ्या प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले होते. चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले होते.