मी देशाचा असा पंतप्रधान आहे की, ज्याने भारताचा कानाकोपरा फिरला – मोदी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी (ता. ३) फेब्रुवारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला दौरा आहे. मोदी यांनी लेह विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. यावेळी ते म्हणाले की लेह -लडाख आणि कारगिलच्या विकासामध्ये केंद्र सरकारकडून कोणतीच कसर ठेवली जाणार नसल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी देशाचा असा पंतप्रधान आहे की, ज्याने भारताचा कानाकोपरा फिरला आहे.

दरम्यान, लेह विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणीवेळेस पंतप्रधानांनी पायाभरणी मी केली आहे, तुमचा आशीर्वाद राहिला तर लोकार्पण करण्यासही येईल. अस म्हणत लोकसभेसाठी पुन्हा संधी द्या असा नाराच दिला आहे. तीन शतकापूर्वी या विमानतळाची इमारत बांधण्यात आली होती, काळानुसार आधुनिकीकरणाकडे लक्ष दिलेले नाही. आज नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. लवकरच या इमारतीचे लोकार्पण देखील करण्यात येईल. मी ज्या योजनेची पायाभरणी केली होती त्याचे आज उद्धघाटन केले आहे. तसेच आज ज्या इमारतीची पायाभरणी (लेह विमानतळ नवीन इमारत) केली आहे त्याचे लोकर्पण करण्यासाठी देखील येईन, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.