दलित संघटनांचा मीच राजा! रामदास आठवले कागदी वाघ ; प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती. त्यानंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. बंद दरम्यान महाराष्ट्रात हिंसाचार झाला होता. आज (शनिवार) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची खळबळ जनक वक्तव्य केलं होत. प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. दलित संघटनांचा मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाना साधत म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील