मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ‘ मी ‘ ठरलो : आमदार भारत भालके

टीम महाराष्ट्र देशा: आरक्षणासाठी राज्यभर पेटलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा आपण बळी ठरला असल्याची माहिती पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी आज जाहीर सभेत दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण आषाढी एकादशीत विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखले. त्याचा परिणाम पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळाले नाही, हा कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू झाला नाही. त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. आपण मराठा मोर्चाचा आपण बळी ठरलो असल्याची कबुली आमदार भालके यांनी दिली आहे.

Loading...

विठ्ठल कारखान्याने हंगामपूर्व कर्ज मागणीसाठी सर्व प्रक्रिया राबविली होती. कारखान्याच्या बाबतीत बॅंकेने एनडीआरचा नवीन नियम लागू केला त्यामुळे या कारखान्याला कर्जपुरवठा होऊ शकला नाही. राज्यातील ४२ तर सोलापूर जिल्ह्यातील १८ साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात बंद आहेत.

विठ्ठल कारखाना माझ्यामुळेच बंद राहिला हे माझ्या विरोधकांनी जनमानसात पसरविले असल्याचा आरोपही आमदार भालके यांनी केला. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आज पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरला आले होते. त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात जिल्ह्यातील व शहरातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण