fbpx

बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि निवडणूक मीच जिंकेन !- महादेव जाणकर

mahadev jankar

बारामती: ‘बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,’ असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जानकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महादेव जानकर म्हणाले, ‘लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. त्यात तडजोड होईल. पण राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून बारामतीचा उमेदवार मीच असेन.

बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही मागणार आहोत. मागील लोकसभेच्या वेळीच मला माढा मतदारसंघ हवा होता. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या पक्षाचे हित समोर ठेवून षडयंत्र केले व त्यांच्याकडे तो मतदारसंघ घेतला,’’