‘मी राज्याचा अध्यक्ष; पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतात’

chandrakant patil and devendra fadnavis

नाशिक :  राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर येत्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावरच लढणार की मनसे सोबत युती करणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपसमोर मोठं आव्हान असून स्थानिक पातळीवर आघाडीची समीकरणे मात्र बदल्याची शक्यता आहे.

महाविकास आघडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आल्यास फायदा होऊ शकतो. अद्याप तरी दोन्ही पक्षांकडून युतीची शक्यता नाकारली जात असली तरी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीबाबत कुजबुज सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नाशिकच्या शासकीय विश्रामगृह आवारात जवळपास १५ मिनिटे चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या. त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं,’ असं पाटील म्हणाले.

यासोबतच, ‘राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात,’ असं सांगतानाच नाशिक महापालिका निवडणुकीबाबत एक शब्द देखील चर्चा झाली नाही असं देखील पाटील यांनी नमूद केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP