fbpx

शालिनी विखेंनी नाकारला भाजपचा ‘जय श्रीराम’, म्हणाल्या मी अजून कॉंग्रेसमध्येच

shalini vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी भाजपचा अहमदनगर नाकारत आपण अजून कॉंग्रेसमधेच असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़ जिल्हा परिषदेत भाजप विरोधात होती़ परंतु, लोकसभा निवडणुकीत चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला़ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची पहिली सभा शुक्रवारी झाली़ या सभेत विखे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले़

ध्वनीक्षेपक हाती घेत त्यांनी अध्यक्षा विखे यांना ‘जय श्रीराम’ केला़ त्यावर विखे यांनी मी अजून काँग्रेसमध्येच आहे, अशी प्रतिक्रिया दिली़ शालिनी विखे यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणेही सभागृहात उपस्थित होते़ त्यांनी लगेच कृपया सभागृहात कुणीही राजकारण आणू नये, असे म्हणत सावरासावर केली़ लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत विखे व वाकचौरे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला़ पण लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली़ आहेत.