‘मैं शर्माती, रोज लगाती…’म्हणणाऱ्या संस्कृतीच्या अदांनी वेधले लक्ष

sanskruti

मुंबई : टेलिव्हिजनवरून करिअरला सुरुवात केलेली मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रीं संस्कृती बालगुडे. संस्कृतीने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली. त्यानंतर अनेक चित्रपटात काम करून तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका साकारल्या आहेत.

अलीकडेच तिचे काही फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत. संस्कृतीने सोशल मीडियावर तिचे केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने केवळ कानात ईअरिंग आणि बिंदी लावली आहे तसेच तिने केसांची सुंदर वेणी घातली आहे. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. या फोटोवर लिहले आहे की, ‘मैं शर्माती, रोज लगाती, काजळ सुरमा लाली.’नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर लव्ह, हार्ट ईमोजी,’या पृथ्वीवरील मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्याचे अप्रतिम रूप.’ त’सूर्याच्या छटा पसरल्या’ यासह अनेक दिसत आहेत.

संस्कृतीने ‘रे राया’, लग्न मुबारक, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे.अलिकडेच ती ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ.निखिल राजेशिर्के या कलाकारांचा समावेश असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या