मीच शिवसेनेचा अधिकृत नवरदेव, तयारीला लागा

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजप युती होणार आहे, त्याची चिंता करू नका. आगामी लढाई दोन शिवसैनिकांची आहे. येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. शिवसेना व ठाकरे कुटुंब माझ्यासोबत आहे. तुम्ही प्रचार सुरू करा. अधिकृत नवरदेव मीच आहे. त्यात बदल नाही, असा विश्वास व्यक्त करत पारनेर विधानसभा मतदार संघात विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी आपल्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

ज्यांना आपल्याबरोबर यायचे आहे, त्यांना आपल्यात घ्या. उद्याच्या काळात विकासाच्या दृष्टीने आपला काळ महत्त्वाचा आहे. सत्ता शिवसेना-भाजप युतीची येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मतदारसंघाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. आपण आपली उंची वाढवली आहे. सत्तेची दारे आपल्याला खुली झालीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन जो गौरव केला, तो माझ्या मतदारसंघातील सर्वांचा गौरव आहे.” असे उद्गार विजय औटी यांनी काढले आहेत.

पारनेर तालुक्यातील पळसपूर, कन्हेर, म्हसोबा झाप, विरोली, काताळवेढे येथील सभामंडप, रस्ते, जलशुद्धीकरण प्रकल्प, शाळाखोल्यांसह अन्य 88 लाख रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ औटी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी काताळवेढ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या