… तर मी पंकजा मुंडे सोबत एकत्र येण्यास तयार – धनंजय मुंडे

pankaja munde & dhananjay munde

पुणे : औरंगाबाद मध्ये जागा असताना मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने मराठवाड्याचे हक्काचे ‘आय आय एम’ नागपूरला पळवले आता जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी अशी एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखवावी तेव्हाच मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही दोघ मिळून कोणाशीही भांडण्यास तयार असल्याच विधान धनंजय मुंडे यांनी केल आहे.

मुंडे भाऊ – बहिणीचा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे सोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. पुण्यामध्ये मराठवाडा प्रोफेशनल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.

तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा बद्दल बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले की, मुंडे साहेबांच्या संघर्षाचा वारसा अगदी ऊसतोडणी कामगारांसहित दुसरी कडे गेला आहे. ज्यांना उसतोडणी कामगारांबद्दल काहीच माहीत नाही ते उसतोडणी लवाद चे अध्यक्ष होऊन बसलेत. अस म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला देखील लावला.

पहा व्हिडीओ काय म्हणाले धनंजय मुंडे