मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पाश्वर्भूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, मी दोन्ही पद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –