fbpx

…तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार – नाना पटोले

टीम महाराष्ट्र देशा :  नागपूर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षश्रेष्ठींनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. असे वक्तव्य पटोले यांनी केले आहे.

निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी नाना पटोले तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकर परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी, लोकसभा निवडणूकीत नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता, तो माझा केवळ ‘जुमला’च होता. भाजपचे लोक संन्याशांना राजकारणात आणतात आणि मी एकदा पराभूत झालो तर संन्यास घ्यायला सांगतात. मी राजकीय संन्यास घणार नाही, असे त्यांनी सांगितले. गडकरी व भाजप नेते यांनी आतापर्यंत १०० जुमले केले होते. मी जर एक जुमला केला तर काय बिघडले. असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवून दाखवावी. असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्य संदर्भात त्यांना विचारले असता, निवडणूकीत अडथळा केल्याप्रकरणी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुद्गल व जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात आमच्यासोबत दुजाभाव केला. आम्हाला ईव्हीएमची तपासणी करुन दिली नाही. मतदार यादी उशीरा दिली. असे आरोप त्यांनी केले.
तसेच, या प्रकरणी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.