‘उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे, माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे’

blank

लखनौ : कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. विकास दुबेला काल (दि.9) उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलीस दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी दुबेने पोलिसांची बंदूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांकडून त्याचा खात्मा झालेला आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.

त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची बातमी पुढे येत आहे. त्यानंतर विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी चेकअप केलं असता त्याला मृत घोषित केलं गेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाल सिंह यांचा विकास दुबेकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे. आज पोलिसांनी जे काही केले आहे त्यामुळे माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे. मी पोलीस प्रशासन आणि योगी सरकारचे आभार मानतो.

‘शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमाने सर्वांची जाहीर माफी मागावी’

कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने 24 तासाच्या आत करणे आता बंधनकारक

पुणे : थायरोकेअर लॅबला दणका, स्वॅब तपासणी बंद करण्याचे आदेश