‘मी पार्थचा बाप आहे आमचं आम्ही बघू ‘ – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

ते म्हणाले “मी पार्थचा बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा,” असं संतापाच्या भरात अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र पवार स्वतःच खळखळून हसले आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात पार्थ पवार हे लोकसभेला शहरात दिसत होते. मात्र विधानसभेला ते सक्रिय का नाहीत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर संतापलेले पवार म्हणाले, ही पत्रकार परिषद पवार घराण्याची चर्चा करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते करू. पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही केलेले पुरस्कृत उमेदवार, आमचा जाहिरनामा किंवा सत्ताधारी असलेल्या व्यक्तींबद्दल घेतलेली भूमिका याबद्दलची चर्चा करा,” असं पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विनवणी केली ते म्हणले “नाराजी दूर करण्यासाठी समोर आलो आहे. नाराज असलेल्यांना हात जोडून विनंती करणार आहे की नाराज होऊ नका. प्रशांत शितोळे यांन भविष्यात चांगल्या ठिकाणी संधी दिली जाईल. सर्वच कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. मात्र, जागा एकच होती. यात कोणी गैरसमज करण्याचं काम नाही. राष्ट्रवादी पुरस्कृत केलेला विलास लांडे, अण्णा बनसोडे आणि राहुल कलाटे यांना निवडून आणण्यासाठी सर्व प्रयत्त्न केले जातील. ” असे सांगत त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार कलाटे यांना राष्ट्रवादीकडून पाठींबा असल्याचेही स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :