मीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

Shoumika Mahadik

कोल्हापूर: काल यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलेल्या सुशांत राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीवर पवारांनी, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे “, अशी प्रतिक्रिया दिली होती.

यानंतर राजकीय पटलावर पुन्हा वेगाने घडामोडी व बैठका झाल्याचे दिसून आले तर विरोधकांसह समर्थकांनी पार्थ पवार यांची काहीशी पाठराखण केली तर काहींनी खिल्ली उडवली. तर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भाजपा पदाधिकारी शौमिका महाडिक यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी काल साडेचारच्या सुमारास या घटनेवर खोचक असे ट्विट केले होते. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते. “कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेला पार्थ” असा उल्लेख असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती

तर, शौमिका महाडिक यांनी आणखी एक ट्वीट टाकले. “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असा टोला लगावत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावर निशाणा साधला.

मराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये

दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सुशांतचा असलेला तरुण चाहता वर्ग, उपस्थित होत असलेले प्रश्न, या तपासाची गांभीर्यता, देशातील सर्वच नागरिकांची असलेली भावना लक्षात घेता या प्रकरणाची लवकरात लवकर योग्य तपासणी होऊन सत्य समोर यावे यासाठी लोकभावना लक्षात घेता सीबीआय चौकशीची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली होती.

दिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त