fbpx

मी २५ वर्षे मुरलेला गडी, इतका सोपा-सरळ नाही : शिवाजी कर्डिले

शिवाजी कर्डिले

टीम महाराष्ट्र देशा : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी आमदार कर्डिले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाजी कर्डिले यांनी ”लोकं काहीही सांगतात, कर्डिलेंचे तिकिट कापणार म्हणे. आता मी २५ वर्षे मुरलेला गडी आहे. मी एवढा सोपा आणि सरळ नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मी सर्वसामान्यातून आलो. मला कुठं वडील, आजोबा, पंजोबांनी सोन्याच्या काड्या दिल्या नाहीत,” अशी खरमरीत टीका विरोधकांवर केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे आमदार कर्डिले यांनी भाजपच्या उमेदवाराचे काम करण्याऐवजी आपले जावई व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे काम केले, असे आरोप होत होते. याबाबत कर्डिले यांनी जाहीर भूमिका स्पष्ट केली नव्हती. डमाळवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात मात्र त्यांनी मनमोकळेपणाने लोकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, ”मतदारसंघासाठी मोठा निधी आपण आणू शकलो. वांबोरी चारीचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकं अनेक अफवा सोडतात. कर्डिलेंना तिकिट मिळणार नाही, अशा गप्पांत तथ्य नाही. मी काही राजकारणात नवीन नाही. २५ वर्षे मुरलेला गडी आहे. इतका सोपा-सरळ माणूस नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. त्यामुळे कोणी काहीही म्हटले, कोणाचे ऐकू नका.” अस विधान केले आहे.