राजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके

nilesh-lanke

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचा विकास महत्वाचा आहे. आगामी काळात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणणार असून तालुक्यातील राजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही. असा टोला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी विरोधकांना लगावला आहे.

परंतु नेमक्या कोणत्या विरोधकाला त्यांनी हा टोमणा मारला, याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे ग्रामपंचायतच्या सुमारे ४८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आ.लंके बोलत होते.

आ.लंके पुढे म्हणाले की, देशात कोरोना महामारीचा हाहाकार चालू आहे. गावागावामध्ये अनेक विकास कामांची मागणी ग्रामस्थ करत आहे. तालुक्यातील साकळाई योजना, के.के.रेंज, राळेगण सिद्धी पाणी योजना अशा अनेक योजनांच्या अनेक वेळा घोषणा होवूनही त्याचे पुढे काहीच झाले नव्हते. मात्र मी आमदार झाल्याबरोबरच अनेक योजनांचा पाठपुरावा करून त्या कार्यान्वित होण्यांसाठी प्रयत्न चालू केले आहे.

तसेच विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे कुठलेही काम राहिलेले नाही. तालुक्यातील अस्तित्व संपलेल्याला लोकांविषयी बोलण्यात वेळ घालविण्यात काहीच अर्थ नाही, तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून विक्रमी मतांनी मला निवडून देवून तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे त्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझी आहे. असे आ.लंके म्हणाले.

यावेळी आ.लंके यांच्या समवेत माजी सभापती सुदाम पवार, प्रा.संजय लाकुडझोडे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके, चंद्रकांत लंके, राहुल झावरे, अरुण पवार, कोहकडीचे सरपंच डॉ.साहेबराव पानगे, जवळ्यांचे उपसरपंच किसनराव रासकर, मार्केट कमिटीचे सदस्य अण्णा बढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे, सोमनाथ वरखडे, युवा नेते सचिन वराळ, विक्रम कळमकर, अरुण कळमकर, बाळासाहेब खोसे, सुवर्णा धाडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-