मी नाराज नाही, भाजपने मला अपेक्षेपेक्षाही खूप काही दिले आहे

Chandrasekhar Bavankule

टीम महाराष्ट्र देशा : पक्षाने मला मंत्रिपद दिले, अपेक्षेपेक्षाही भाजपने मला खूप काही दिले आहे. गेल्या तीस वर्षापासून मी भाजपमध्ये आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेत्यांवर भाजपने कोणताही अन्याय केला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत मला तिकीट नाकारल्याचे कोणतेही शल्य माझ्या मनात नाही, असे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या  मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच भाजप सोडून गेलेल्या माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपविषयी बोलू नये असतोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे, त्यांचे राजकीय भविष्य संपविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वात आज सकाळी एकनाथ खडसे यांच्या घरी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसेंना पाठींबा असल्याचे सांगितले.
दरम्यान, भाजपचे तब्बल डझनभर आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून ते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे. याशिवाय भाजपाचे राज्यसभा खासदार देखील नाराज असल्यामुळे तेही महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपला गळती लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...