fbpx

‘कुणी माझा वापर करुन घेईल एवढा मी वेडा नाही’ : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. परंतु निवडणूक लढवणार नसले तरी मनसे राज्यात १० ठिकाणी सभा घेवून भाजपविरुद्ध प्रचार करणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये कुजबुज सुरु आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वापरून घेत आहेत. याला प्रतिउत्तर म्हणून राज ठाकरेंनी ‘कुणी माझा वापर करुन घेईल एवढा मी वेडा नाही’ असं विधान केलं आहे.

मोदींनी २०१४ च्या तुलनेत शब्द बदलले आहेत, नोटाबंदीने चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे देश संकटात आहे. देश संकटात असताना भूमिका बदलावी लागते, असं ते म्हणाले. मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून निवडणूक न लढवता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला, असं राज ठाकरे म्हणाले

राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेत असल्याने याचा फटका नक्कीच सेना- भाजप युतीला बसणार आहे. त्यामुळे या प्रचारसभांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.