सरकारचा रिमोट नेमका कोणाच्या हातात ?, शरद पवार म्हणतात…

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा सहभाग आहे.

पहिल्या सत्रात शरद पवार यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, साहित्य, संगीत,नाटक ह्या गोष्टीचा राज्यात प्रसार वाढला पाहिजे. सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे याची काळजीही घेणं आवश्यक आहे. आपण मराठीचे अभिमानी आहोत, पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिकही आहेत. त्यामुळे भाषिक ऐक्य असणं गरजेचं आहे, असे खा. पवार म्हणाले.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘जुन्या सरकारचे निर्णय बदलले, हे मान्य आहे. परंतु त्यामुळे राज्यावर विशेष परिणाम होईल, असं वाटत नाही. तसेच सरकारचा रिमोट तुमच्या हातात आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना पवार म्हणाले, ‘या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही. एकदा उभं करून द्यायचं आणि सगळं नीट चालायला लागल्यावर मी लांब झालो. गरज पडली, मदत मागितली की मी आहे. यापेक्षा जास्त सरकारशी संबंध ठेवायचा नाही, हा निर्णय घेतला,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर हे अवलंबून असतं. त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे,’ असे म्हणत पवार यांनी हे सरकार 5 वर्षे चालणार असा विश्वास व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हे तर 3 पक्षांचं सरकार आहे, 1978 ला मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मला आठवत नाही,’ असे खा. शरद पवार माझा व्हिजन कार्यक्रमात बोलत होते. ‘शेतीवरचा भार कमी करायला हवा, शेतीवरील अवलंबून लोकसंख्या कमी झाली तर शेतीक्षेत्राचा विकास होईल, विकसित देशांचं हेच सूत्र आहे,’ असे पवार म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती