निवडणूक लढवणार की नाही? वाचा शरद पवारांचं उत्तर

sharad-pawar

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे.

राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा – पवार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

एक नव्हे तर पवारांचे दोन नातू एकाच वेळी राजकारणात उतरण्याची शक्यता

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना पुण्याच्या जागेची मागणी केली होती. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम पाहता ही जागा आपल्याकडेच असावी असं कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी देखील मागणी काकडे यांनी केली होती.

पागोटे भुजबळांच्या डोक्यावर; ओझे धनंजय मुंडेंना होणार….