… मी काही ज्योतिषी नाही- गिरीश बापट

Girish_bapat

टीम महाराष्ट्र देशा- वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता मात्र आता बापट यावर स्पष्टीकरण दिले आहे. पढच्या वेळी आमचे सरकार येणार नाही, असे काही आपण बोललो नव्हतो, मी काही ज्योतिषी नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

बारामती तालुक्यातील विविध उदघाटने पालक मंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी माळेगांव (ता.बारामती) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे,आमदार बाळा भेगडे,बाळासाहेब गावडे,चंद्रराव तावरे, रंजन तावरे, रामचंद्र निंबाळकर,तानाजीराव थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

Loading...

नेमकं काय म्हणाले होते याआधी बापट
पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या अस वक्तव्य करून गिरीश बापट यांनी खळबळ उडवून दिली आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं .

गिरीश बापट यांनी काल दिलेलं स्पष्टीकरण
लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी नवीन सरकार येते. त्यामुळे पालकमंत्री हे पद निश्चित राहील हे सांगता येत नाही. एखादा प्रस्ताव शासनाकडे येउन त्याला निधी देण्यासाठी वर्ष दिड वर्ष शिल्लक आहेत. डाळींब उत्पादकांना जागा द्यायची आहे. आगामी वर्षभरात मागण्या मान्य करुन घ्या.पुढे काय व्हायचे ते होईल, असे वक्तव्य आपण केले होते. अधिकारी,मंत्री बदलतात, असा तो आशय होता. त्यामुळे पुढच्या वेळी आमचे सरकार येणार नाही, असे काही आपण बोललो नव्हतो, मी काही ज्योतिषी नाही, असे स्पष्टीकरण बापट यांनी दिले.

दरम्यान याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर देखील बापट यांनी कडाडून टीका केली. बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी मोडीत काढत भाजप ताठ मानेने उभा राहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भ,मराठवाडा,कोकणात या भागात तुरळक अस्तित्व आहे. या पक्षाला राज्यस्तरीय स्वरुप नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका भाजप जिंकेल. इंदापुर,बारामतीमध्ये भाजपचा वेग वाढत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष राहिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत.यांनीच मागच्या १५ ते २० वर्षांत मारलेल्या डल्यांमुळे कामे करता आले नाही.सिंचन,रस्ते, जलयुक्त शिवार,पाणीपुरवठा आदीबाबत निर्णय जनतेच्या विरोधात घेतले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा