मी नाराज नाही,मी भाजप सोडणार नाही.-एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा: बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते एकनाथ खडसे कॉंग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश करा या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले होते की,कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही. अन्याय झाला तेव्हा वेळीच त्याचा प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते असे सुचक वक्तव्य त्यांनी केले होते.

त्यानंतर खडसे भाजप सोडतील अशा चर्चा रंगल्या होत्या.मात्र आज त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी नाराज नाही. मी भाजप सोडणार नाही.मी कुठल्याही पक्षात जाण्याचा प्रश्न नाही.अर्धवट व्हिडिओ पसरवण्यात आला आहे.सध्या माझा कुठेही जाण्याचा विचार नाही.माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे.