मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ, वैरागचे मकरंद निंबाळकर आ. सोपलांना आव्हान देण्यास तयार

विरेश आंधळकर : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्यामुळे आमदार दिलीप सोपल यांच्यासोबत पक्ष सोडणार नाही, तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणुक लढवण्यास तयार असल्याचं, झेडपीचे माजी बांधकाम सभापती मकरंद निंबाळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले आहे. बार्शी मतदारसंघातील वैराग भागामध्ये निंबाळकर कुटुंबाचा पगडा असल्याने सोपल यांना पर्याय म्हणून मकरंद निंबाळकर यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याची चाचपणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. आता खुद्द निंबाळकर यांनी लढण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आ. दिलीप सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पुढील आठवड्यात सोपल यांचा प्रवेश होणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे सोपल यांनी राष्ट्रवादी सोडल्यास त्यांना लढत देण्यासाठीचे पर्याय राष्ट्रवादीकडून शोधले जात आहेत. यामध्ये दोन दिवसांपासून मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

Loading...

बाळराजे पाटील हे बाहेरील मतदारसंघातील असल्याने बार्शीकर जनता त्यांना स्वीकारेल का ? हा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मकरंद निंबाळकर योग्य उमेदवार ठरू शकतात. आमदार दिलीप सोपल गटातील सहकारी असणारे मकरंद निंबाळकर हे माजी आमदार नाना निंबाळकर यांचे पुतणे आहेत. जिल्हा दूध संघाचे संचालक, जि.प.चे राष्ट्रवादीचे माजी गटनेते, जि.प.चे माजी बांधकाम आणि अर्थ सभापती, अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या नावाला पसंती मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
'त्या' घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !