fbpx

मी राहुल गांधींशी एकनिष्ठ : संजय निरूपम

मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपमांची उचलबांगडी करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक एकवटलेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट निरूपम यांना हटवण्याची मागणी करण्यात आल्याचं समजतंय. तर दुसऱ्या बाजूला मी राहुल गांधींशी एकनिष्ठ आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माझी निवड ही राहुल गांधींनीच केली. तसेच मुंबईत जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा आदेशही मला राहुल गांधींनीच दिल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या निरुपम गटातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीवेळी संबंधित नेत्यांनी सत्य परिस्थिती कथन केली. तसेच निरुपम यांच्याबाबत तक्रारी करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी माहितीही त्यांनी दिली.