संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी निळा झेंडा घेऊन सत्तेत आहे – रामदास आठवले

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ; ऍट्रॉसिटी ऍक्ट आणि दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हाती निळा झेंडा घेऊन मी सत्तेत आहे. दलित आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना जेल मध्ये घालण्यासाठी आणि निरपराधांना जेल बाहेर काढण्यासाठी मी सत्तेत आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दहिसर चेकनाका येथे रिपाइं च्या वतीने आयोजित महापुरूषांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ना आठवले बोलत होते.

आंबेडकरी चळवळीत काम करीत राहिल्याने कार्यकर्त्यांना सत्तेची संधी जरुर मिळते. दलितांवर अत्याचार होतात हे खरे असून त्याचा तीव्र निषेध आपण केला पाहिजे. मात्र अधिक प्रमाणात नकारात्मक विचार करणे सोडले पाहिजे. आता लोक जातीभेद विसरून एकत्र येतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तथागत बुद्धांच्या अहिंसा तत्वावर आधारला असून तो तोडणारा विचार नसून माणूस जोडणारा विचार आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.व्हॉटस एप वरचा मी नेता नसून लोकांचा नेता आहे. जयभीम चा नारा बुलंद करण्यासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची माझी तयारी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देशात वाढविण्याचे पोहोचविण्याचे काम करणारे लोकाभिमुख नेते केवळ रामदास आठवले आहेत असे गौरवोद्गार आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे आपण वसई विरार चा महापौर होऊ शकलो असे कृतज्ञ उद्गार वसई विरार चे महापौर रुपेश जाधव यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला कार्यकर्त्यानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला त्यांच्या हाती निळा झेंडा देऊन ना रामदास आठवलेंनी स्वागत केले. यावेळी प्रचंड संख्येने आंबेडकरी जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमात अंध दिव्यांगजन कलाकारांनी भीमगिते सादर केली. त्यांचाही सत्कार रामदास आठवलेंच्या हस्ते झाला .

You might also like
Comments
Loading...