माझी प्रकृती चांगली आहे,काळजी नसावी : रामदास आठवले

ramdas athawale

मुंबई: सुरवातीला जेव्हा जगभर कोरोनाचा प्रसार वाढत होता त्यावेळी लोकांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘गो कोरोना गो’ हा नारा देणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात देखील सतत लोकांच्या सेवेसाठी सोबतच पक्षवाढीसाठी काम करणारे रामदास आठवले हे कोरोना बाधित झाल्याने रिपाईचे अनेक कार्यकर्ते साहेब लवकर बरे व्हावेत यासाठीं प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, आठवलेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आठवलेंना कोरोनाची लक्षणे नाही आहेत. त्यामूळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहन केले आहे. सध्या मुंबईत एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी आठवले दाखल होणार आहेत.देवेंद्र फडणवीस, अजित पवार , सुनील तटकरे आणि आता रामदास आठवले असे राज्यातले चार मान्यवर नेते कोरोना बाधित झाले आहेत.

दरम्यान, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला मी पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत, असं ट्वीट रामदास आठवले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या