सोलापूर : सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यासोबत एक अजब प्रकार घडला.सांगोला तालुक्यातील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी “आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा”, असे म्हणत सदाभाऊंच्या गाडीचा ताफा अडवला. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. आता यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ह्या प्रकरणात जिल्हयातील राष्ट्रवादीच्या टमाटू सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांनी ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच मिडिया समोर वाचला. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचेची यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “तुम्ही असे हल्ले करून आणि कुभांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही. हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल.
महत्वाच्या बातम्या –