“शरद पवारांमुळेच मी इथं”; नवनीत राणांनी उधळली स्तुतीसुमने
अमरावती : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावतीत दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. “शरद पवार हे महाराष्ट्राचे महान नेते आहेत. सगळे जण त्यांच्याकडे पाहून आपल्या राजकारणाची सुरुवात करतात, मलाही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची कायमच ऋणी आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे मी आज इथे आहे. आम्ही त्यांचा अमरावतीकरांच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी ही कार्यक्रमाला जाणार आहे.” असे नवनीत राणा म्हणाले.
२०१४ आणि २०१९ ची निवडणूक नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीचा पाठिम्बा घेऊन लढवली होती. खुद्द शरद पवार यांनी राणा यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. निवडून आल्यानंतर मात्र राणा हे भाजपचे समर्थन करू लागल्या. यामुळे राणा यांनी आज पवारांची स्तुती केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राणा हे पवारांच्या सभेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत.
शरद पवार या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाटी, आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आजचा दौरा महत्वाचा मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :