‘प्रतिभावंत नंबी नारायणन यांना भेटून मला आनंद झाला’

पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात चित्रपट सृष्टी मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. जसे भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी, सायना नेहवाल, मिल्खा सिंग, तसेच राजकीय व्यक्तींच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये जयललितांनी वरील थलाईवी या सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येतो. यामध्ये आता आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आर. माधवन दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तो त्याचा पहिला चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत करत असून ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर याद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आर माधवन आणि शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी या बद्दल ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, तुम्हाला (माधवन) आणि प्रतिभावंत नंबी नारायणन यांना भेटून मला आनंद झाला. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण विषय रेखाटण्यात आला आहे, ज्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहित असले पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आपल्या देशासाठी महान बलिदान दिले आहे, ज्याची झलक ‘रॉकेट्री’च्या क्लीपमध्ये दिसली.

आर. माधवनने नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले. आर.माधवनने या आधी त्यांच्या मीटिंगचा फोटो पोस्ट केला होता. आर. माधवनने चित्रपटाची क्लीप पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. या चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला रिलीज केला होता. या चित्रपटात अभिनेता आर. माधवन नंबी यांची भूमिका साकारतो आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हिंदी, तेलुगू, मलयालम, तमिल, अंग्रेजी आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या