‘वर्षा’पेक्षा ‘सागर’ बंगल्यातच मी अधिक खूश- अमृता फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ‘वर्षा’ बंगल्यापेक्षा नागूरमधील ‘सागर’ बंगल्यामध्ये जास्त आनंद मिळत असल्याचं म्हंटल आहे. गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी प्रदर्शित केलेल्या गाण्याबाबतची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी वर्षा पेक्षा सागर बंगल्यामध्ये जास्त खूश असल्याचं सांगितलं आहे.

सध्या राहत असलेल्या सागर बंगल्यावर तणावमुक्त असल्याने मी अधिक खूश असल्याचं अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलं. नागपूरचं घर, वर्षा बंगला आणि आत्ताचा सागर बंगला, ह्या तिन्ही जागा माझ्या मनाच्या जवळ आहेत. त्याची कारण वेगवेगळी होती. नागपूरचं घर म्हणजे माझ्या आईचं घर आहे, ते घर माझी जान आहे. ‘वर्षा’ बंगला ही एका जबाबदारीची जागा होती, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मी एन्जॉय केलं, असे तुम्ही नाही म्हणू शकत. मी वर्षा बंगल्यात एन्जॉय नाही केलं. पण, मी सातत्याने याच विचारात असायचे की, या पोझिशनला मी अल्टीमेट कसं करू, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

मी नागपूरच्या घरी एन्जॉय केलं, आज इथं सागर बंगल्यातही एक मेंटल रिलीफ आहे. जे करायचंय ते मी करते सुद्धा, कारण इथे पोझिशनचा प्रेशर नाही. त्यामुळेच, फ्रीडम ऑफ माईंडचा विचार केल्यास मी सागर बंगल्यात खूप खुश आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं. नागपूरच्या घरीही खूश होती, पण वर्षा बंगल्यात राहत असताना, या जागेचा फायदा लोकांसाठी कसा करता येईल, हाच विचार मी करायचे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :