मी राजकारणात सर्वांचा आजोबा – रावसाहेब दानवे

टीम महाराष्ट्र देशा :  दोन वेळा आमदार, पाचवेळा खासदार झाल्याने मी राजकारणात सर्वांचा आजोबा झालो आहे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जालन्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्या नंतर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली. त्यानंतर जालन्यातील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, त्यावेळी मी स्टेजवर भाषणाला उभा राहिल्यावर ज्या दिवशी टाळ्या शिट्ट्या वाजणार नाही तो दिवस माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असेल. तिथून पुढे मी राजकारण सोडून देईन. असे रावसाहेब दानवे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मी माझी भाषा सोडून दुसऱ्या भाषेत बोलायला लागलो तर मी यापुढे कधीच निवडून येऊ शकणार नाही. माझी गावरान भाषा आहे. त्यातून कोणीही काहीही अर्थ काढला तरी मी ती बदलणार नाही. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, मी पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलो हे माझं भाग्य आहे. मी दोन वेळा आमदार, पाचवेळा खासदार झाली आहे, त्यामुळे झाल्याने मी राजकारणात सर्वांचा आजोबा झालो आहे, असेही त्यांनी म्हंटले.