आपण विष्णूचा अवतार असल्याने ऑफिसला येऊ शकत नाही; इंजीनिअरचे अजब उत्तर

गांधीनगर- गुजरातच्या वडोदरामधील सरदार सरोवर निगममध्ये काम करणारा एका इंजीनिअर सध्या चर्चेत आला असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसलाच गेला नाही. तो ऑफिसला गेला नसल्याने त्याला सरदार सरोवर निगमच्या वतीन करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान या नोटीसला उत्तर देताना आपण विष्णूचा दहावा अवतार असल्यामुळे ऑफिसला येऊ शकत नसल्याचं त्याने म्हंटलं आहे. रमेशचंद्र फेफरे असं या इंजीनिअरचं नाव आहे.

Loading...

‘ऑफिसमधील सततच्या कामामुळे त्यांना ध्यान करण्यात अडचण येत असल्याने सुट्टी घेतली आहे’, असं ही त्यांनी ऑफिसच्या नोटीसला उत्तर देताना म्हटलं. ‘मी राम व कृष्णाचा अवतार आहे. माझी आई अहिल्याबाई आहे तर पत्नी लक्ष्मीचा अवतार असल्याचं’, रमेशचंद्र म्हणाले.

‘जगाची चिंता आहे आणि पाऊस चांगला पडावा यासाठी ध्यान करण्यात मी तल्लीन आहे. म्हणून मी ऑफिसला येऊ शकत नाही’, असं उत्तरही त्यांनी ऑफिसला दिलं. रमेशचंद्र गेल्या 8 महिन्यात फक्त 15 दिवस ऑफिसला गेले आहेत. ‘माझ्या साधनेमुळेच गेल्या काही वर्षापासून चांगला पाऊस पडतो आहे, असा दावाही त्याने केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...