तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर

lata mangeshkar

टीम महाराष्ट्र देशा : ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. अशी प्रतिक्रिया भारताची गान कोकीळा लता मंगेशकर यांनी दिली आहे. तब्बल २८ दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्या आता घरी परतल्या आहेत. रुग्णालयातून घरी परतल्याची माहिती स्वतः त्यांनीच ट्विटरवरून दिली.

“नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा,” असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

Loading...

दरम्यान, यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत. लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.

लता मंगेशकर यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरचेही आभार मानले आहेत. “माझ्यावर काळजीपूर्वक आणि प्रेमानं उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार. डॉ. प्रतीत समधानी, डॉ. अश्विनी मेहता, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निंबाळकर आणि डॉ. राजीव शर्मा या डॉक्टरांविषयी लता मंगेशकरांनी आभार व्यक्त केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले