आधी डॉक्टर नंतर खासदार ; डॉ. प्रीतम मुंडेंनी केली गरोदर महिलांची तपासणी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गरोदर माता तपासणी शिबीर व गोवर रूबेला लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पा येथे खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या की, ‘पुढारीच्या पेशात आपलेसे वाटत नाही. आधी डॉक्टर नंतर खासदार आहे.’

ग्रामीण भागातील गरोदर माताची मोफत आरोग्य केंद्रात तपासणी होते हे चांगला उपक्रम आहे. आरोग्य विभागाचे उपक्रम हे थेट लाभार्थी पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. असंघटीत क्षेत्रातील मातांना आरोग्य सेवेत समाविष्ट करण्यात यावे तसेच सर्व शासकीय रूग्णालयात शासकीय सेवाची माहिती प्रथमदर्शनी लावावी, असे मत खासदार डॉ. प्रतिम खाडे यांनी कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.