सध्याचे देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते : नसिरुद्दीन शाह

टीम महाराष्ट्र देशा– बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह सुमित नावाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याच मुद्द्यावर आता जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी भाष्य केलं आहे. सध्याचे देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटत असून या देशात एका गाईच्या मृत्यूला पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं असं वक्तव्य शाह यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शाह ?

‘या देशात एका गाईच्या मृत्यूला पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं . देशात हे विष पसरलंय आणि त्याला योग्य वेळी थांबवणं खूप गरजेचं आहे .देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाहीये. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगलं किंवा वाईट याचं धर्माशी काही देणंघेणं नाही असं मला वाटतं. काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या मुलांना मी शिकवलं आहे. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरलं आणि तुमचा धर्म कोणता असं विचारलं तर ते काय उत्तर देणार याची मला चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नसेल.’Loading…
Loading...