मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा

मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा

Pravin Darekar

कोल्हापूर : पूरग्रस्त भागात दौऱ्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट पूर्णनियोजित नव्हती असा दावा करण्यात येत आहे. यातच आम्ही दौरा करत असताना मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी थांबा असा निरोप पाठवला होता, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

कोल्हापूर दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले असता त्यांनी विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये काही काळ संवाद देखील झाला. मात्र, हा संवाद पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या भूमीकेसंदर्भात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यावरुन आता राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निरोप पाठवला असल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे. आम्ही दौरा करत असताना मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आला. त्यांनी निरोप दिल्यामुळे आम्ही काही काळा त्याच ठिकाणी थांबलो असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांची भेट झाली असून त्यांच्यामध्ये केवळ पूरपरिस्थितीबाबत संवाद झाला असल्याचे दरेकर यांनी सांगितले. एका वृत्त वाहिनीशी बोलतांना त्यांनी हा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या